
दरवर्षी स्नेहसंमेलन साजरे करणार असा सर्वानुमते निर्णय
लोकशक्ती न्यूज l प्रा. विजय लेंडाळ
शेवगाव : इयत्ता दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून आज २० वर्षे झाली, अर्थातच ते साल होते २००४. श्री भगवान विद्यालय, बालमटाकळी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर इथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. पण व्हाट्सअप आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला.
आमच्या दहावीच्या २००४ च्या बॅचचे गेट टुगेदर मागील वर्षी दिपावली नंतर श्री. भगवान विद्यालयात मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं होतं. मागील काही दिवसात वर्गमैत्रिणींनी आपण या वर्षीही वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करू असे सुचविल्याने सर्व मुलं कामाला लागले व हॉटेल आण्णाई, बोधेगाव येथे मोठ्या उत्सहात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे लाडके शिक्षक चत्रू राठोड सर होते तर प्रमुख पाहूणे श्रीकृष्ण वेदपाठक सर व नाम फाउंडेशनचे मराठवाडा विभागप्रमुख शेळके साहेब हे योगेश रसाळ यांच्या माध्यमातून उपस्थित होते.
सकाळी हॉटेलवर आल्यानंतर कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडला. त्यानंतर दुपारी जेवल्यावर एकमेकांच्या माहितींची देवाणघेवाण झाली. गप्पा सुरु झाल्या. आपलं लग्न, जोडीदार, ते निभावणं याबद्दल सगळ्यांनी आपापले विचार शेअर केले. प्रत्येकजण आपापल्या कहाण्या सांगण्यास उतावीळ झाले होते. बोलता बोलता थट्टा मस्करीही होत होती. सर्वानीच शालेय जीवनातील गमतीजमती सांगितल्या. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. सोपान शेटे यांनी सर्वांना दिलखुलास हसवलं. तर आबासाहेब मोडे याने जीवनात घडलेल्या कठीण प्रसंगाची माहिती सांगून सर्वांना भावनिक केले. दिलखुलास गप्पा मारता मारता फोटो सेशनही झालं. जेवणानंतर शालेय जीवनातील आठवणींवर दिलखुलास गप्पा झाल्या. कोणी लाजत लाजत तर कोणी मनमोकळेपणानं व्यक्त झालं. या गेटटुगेदरला जे येऊ शकले नाहीत त्यांनी ग्रुपवरील फोटो पाहून आनंद घेतला व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं नियोजन प्रा. विजय लेंडाळ यांनी उत्तमरीत्या केलं होतं. येणाऱ्यांशी संपर्क साधण्यापासून ते जेवण व्यवस्था इथपर्यंत झकास व्यवस्था केली होती. पल्लवी बोथरा-राका यांनी सर्व वर्ग मैत्रिणींना संपर्क करून कार्यक्रमांस येण्यास भाग पाडले. आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून पस्तीशी ओलांडलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी संजीवनी धोंगडे – साळुंके, उर्मिला शेळके, वंदना कदम – देवढे, वर्षा देशमुख – जाधव, शीतल वैद्य – धाडगे, धनश्री देशमुख, सुरेखा पोपळभट, सुलभा शिंदे, कमल काळे, सुरेखा वाघुंबरे, कालिंदा वाघुंबरे, प्रकाश देशमुख, आण्णा शिंदे, ज्ञानेश्वर चव्हाते, मोहन धनगुडे, स्वप्नील हाकाळे, सचिन गायके, रामेश्वर बामदळे, संदीप चव्हाण, विनोद देशमुख, संभाजी साबळे, शिवनाथ पोपळभट, अमोल भिसे, कैलास भिसे, लिंबाजी गव्हाणे, योगेश परदेशी, वर्धमान डेरे यांच्यासह अनेक वर्गमित्र-मैत्रिणी उपस्थित होते.