
सुखदेव गायकवाड शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील किड्स कॅम्पस प्री प्राइमरी स्कूल चापडगाव या शाळेची सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सुरुवात झाली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्री प्रायमरी वर्गाची रचना करण्यात आलेली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालक यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी शाळेच्या प्राचार्या – सौ.जयश्री अर्जुन मडके, कृष्णा अर्जुन एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष – श्री अर्जुन मडके सर व शिक्षिका- रेणुका व्यवहारे मॅडम या सर्वांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. यावेळी पालक श्री नितीन गायकवाड, श्री विजय पातकळ, श्री भरत विखे, श्री संतोष विखे, श्री लक्ष्मण मडके, श्री ज्ञानेश्वर मडके आदी पालक उपस्थित होते चालू शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अर्जुन मडके सर यांच्याकडून करण्यात आले.नर्सरी, एल. के.जी.,यु.के.जी.या वर्गाचे प्रवेश चालू आहेत. डिजिटल स्कूल ही संकल्पना राबवली आहे. शाळेकडे अद्यावत कम्प्युटर लॅब, लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध आहेत.दप्तरावीना शाळा ही संकल्पना सत्यात उतरवण्याचा शाळेचा मानस आहे.