
अमोल म्हस्के कांबी प्रतिनिधी
शेवगाव येथील कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समुह संचालित श्री संत गाडगे महाराज कन्या छात्रालय चापडगाव येथे मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या शासन मान्य मागासवर्गीय वसतिगृहात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इ .५ वी ते १० वी च्या मुलींसाठी शासनाच्या विहित टक्केवारी नुसार अनु .जाती व अनु .जमाती प्रवर्गासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे . या वसतिगृहामध्ये इ .५ वी ते ८ वी पर्यतंच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, सर्व सोयीयुक्त निवासाची, उत्तम दर्जेदार नाष्टा व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. वसतिगृहात वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना दिली जाते तसेच मुलींच्या चापडगाव येथील वसतिगृहाच्या आवारातच माध्यमिक विद्यालयाची सुविधा उपलब्ध आहे.
आबासाहेब काकडे शैक्षणिक समुह सतत शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असला पाहिजे हा दृष्टिकोन असणारे आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.शिवाजीराव काकडे व जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ सर , वसतिगृह विभाग प्रमुख रविंद्र कुटे सर यांचे सततचे प्रोत्साहान व मार्गदर्शन वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते .वसतीगृह प्रवेशासाठी ९१३०६४०६६१,७५८८५४३५५७ या मोबाईल नंबर वरती संपर्क करून किंवा वसतिगृहाच्या ठिकाणी येऊन पालंकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहान वसतिगृह अधिक्षिका अश्विनी अकोलकर यांनी केले आहे .