
वाशिम जिल्हा प्रतिनिधी राम इढोळे
मालेगाव तालुक्यातील मुंदडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी “गुरू पौर्णिमा” निमित्त ता.२२ रोजी सकाळी नऊ वाजता गाडगे बाबा नगर मध्ये वृक्ष दिंडी द्वारे वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.व ओंकार गिर बाबा सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले.
ओंकार गिर बाबा सभागृहात संस्थानचे अध्यक्ष आरुणभाऊ बळी, गजानन नवले,जटाळे गुरुजी, महेंद्र उंबरकर, यांनी दिंडीतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत केले. प्रा.पी.एस.खिराडे,
प्रा.अनिल काळे प्रा.संजाब वाहेकर, अमोल कल्याणकर, यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले व घरोघरी एक व्यक्ती एक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.यावेळी उपमुख्याध्यापक सौ.संध्या उंबरकर, शिक्षिका मलीता राठोड, सविता क्षीरसागर, योगिता बळी,यांनी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले.
यावेळी प्रा.अनिल काळे,प्रा.संजाब वाहेकर,प्रा.किशोर बयस,पर्यवेक्षक दिनकर गुडघे,ठाकरे सर,,प्रा.अरविंद पिंपळकर,प्रा.किसन राठोड, संजय साबळे, प्रसाद वावडे, योगिता बळी, सुधिर सारडा, राजेश मोरे, सचिन देवळे, सौ.घुगे मॅडम प्रा.अंकुश सोमाणी,प्रा.रवि शिंदे,प्रा.अंकित महाजन, दिपक आदी शिक्षकासह नगर मधील दिपक रणबावळे,प्रकाश भालेराव,आदीसह अनेक नागरिक उपस्थित होते.