Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeक्राइमचार हजारांची लाच भोवली : भुसावळातील महिला सहा. अभियंत्यांसह दोन लाईनमन एसीबीच्या...

चार हजारांची लाच भोवली : भुसावळातील महिला सहा. अभियंत्यांसह दोन लाईनमन एसीबीच्या जाळ्यात

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

भुसावळ : हॉटेल चालकावर जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट केल्याचा ठपक ठेवत नवीन वीज मीटर बसवून जुन्या मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी सुरूवातीला 20 हजार व नंतर 15 हजार रुपये लाच मागत चार हजारांची लाच तडजोडी अंती स्वीकारणाऱ्या वीज कंपनीच्या भुसावळातील रहिवासी व सावदा विभाागतील पाडळसा कक्ष कार्यालयातील महिला अधिकाऱ्यासह लाईनमन व वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगाव एसीबीने गुरुवार, 19 रोजी दुपारी दोन वाजता अटक करताच वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे (42, हुडको कॉलनी भुसावळ) तसेच लाईनमन संतोष सुकदेव इंगळे (45, मल्हार कॉलनी, फैजपूर) व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी (39, अयोध्या नगर, भुसावळ) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. तीन्ही लाचखोर सावदा विभागातील पाडळसा कक्ष कार्यालयात कार्यरत आहेत.

नेमकं काय आहे लाच प्रकरण:-

भुसावळ तालुक्यातील 34 तक्रारदार हे हॉटेल व्यावसायीक आहेत. त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन वीज मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे, असे भासवून तक्रारदार यांच्यावतीने सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात तीन्ही आरोपींनी सुरूवातीला 20 हजार व नंतर 15 हजार रुपये लाच बुधवार, 18 रोजी मागितली होती व चार हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी संतोष इंगळेने गुरुवारी दुपारी दोन वाजता लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर अन्य दोघा आरोपींनाही अटक करण्यात येवून त्यांच्याविरोधात फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular