Friday, April 11, 2025
spot_img
30.5 C
Delhi
Friday, April 11, 2025
spot_img
Homeक्राइमधक्कादायक: नातेवाईकांचा दवाखान्यात धूडगूस, तोडफोड करून मेडिकल चालकाला मारहाण

धक्कादायक: नातेवाईकांचा दवाखान्यात धूडगूस, तोडफोड करून मेडिकल चालकाला मारहाण

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एका बालिकेचा निमोनियाआजाराने गंभीर होऊन उपचार न मिळाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या उभाड पाटील हॉस्पिटलमध्ये शिरून प्रचंड तोडफोड करून औषधी व्यावसायिकाला जबर मारहाण केली. तर परिचारिकांच्या मागे धावून धमकावले. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वंशिका पंकज बाविस्कर (वय ७ महिने रा. पिलखेडा ता. जळगाव) ही मुलगी जळगाव तिच्या परिवारासह राहते. तिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नातेवाईकांनी तिला नूतन मराठा महाविद्यालयाच्या पुढील डॉ. उभाड पाटील यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना तिला निमोनिया हा आजार झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले होते. यावेळी डॉक्टरांनी तिला ऍडमिट केले व पुढील धोक्यांसंदर्भात नातेवाईकांना कल्पना दिली. त्यानंतर तिची प्रकृती काल दुपारी ४ वाजता खालावल्यामुळे नातेवाईकांनी तिला आकाशवाणी चौकातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र बाळाची प्रकृती अधिक खालावल्यामुळे नातेवाईक पुन्हा उभाड पाटील यांच्या दवाखान्यात आले.

त्या ठिकाणी थेट परिचारिका आणि औषध व्यवसायिक यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तेथील एलईडी टीव्ही, खुर्चा, टेलिफोन, फ्रिज यासह खिडक्यांच्या काचांची प्रचंड तोडफोड केली. यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिका स्वाती सोनवणे, कल्पना वाघ, प्रमिलाबाई पिंगळे यांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले.

गणेश मेडिकलचे मानस ठोके यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही नातेवाईकांनी मारहाण केली. नंतर ते बाळाला घेऊन दुसरीकडे निघून गेले. हा प्रकार डॉ. दिलीप उभाड पाटील यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनीही भेटी दिल्या आहेत. सदर घटनेबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular