
लोकशक्ती न्यूज | प्रतिनिधी।भुसावळ येथील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळ असलेल्या डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा दुकानात आज सकाळी पुन्हा गोळीबार झाल्याची घटना समोर आली यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाम मोहल्ला भागातील हॉटेल डीडी सेंटर येथे सकाळी साडेसहा वाजता गोळीबार झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागे पूर्व वैमनस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भुसावळमध्ये गुन्हेगारी थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी गुन्हेगारी कमी होण्याऐवजी सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.