Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeक्राइमखंडणीत दारू !!! वाईन शॉप चालकाला चाकू दाखवत घेतली दारू !

खंडणीत दारू !!! वाईन शॉप चालकाला चाकू दाखवत घेतली दारू !

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव :- जळगाव शहरात तळीरामांची कमी नाही, क­मरेला लावलेला चाकू दाखवून ये दारुकी दुकान चालू रखनी है, तो तुझे डेली दारु का बंफर नही दिया तो सबको मार डालूंगा, तुम्हारी दुकान चलने नही ढुंगा. असे म्हणत संशयित रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ कालीया याने खंडणी म्हणून दारु घेवून गेल्याची घटना दि.१२ रोजी दुपारच्या सुमारास ईच्छादेवी चौकातील वाईन शॉपवर घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आकाशवाणी ते ईच्छादेवी चौफुलीदरम्यान असलेल्या अशोका लिकर शॉपीवर राजेश साधूराम कार्डा (रा. भुसावळ) हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. शहरातील तांबापूरा परिसरातील रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ काल्या हा त्यांच्या लिकर शॉपीवर येवून नेहमी चाकूचा धाव दाखवून दारु घेवून जात होता. दि. १२ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास रिजवान शेख उर्फ काल्या हा वाईन शॉपवर आला. त्याने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून तो दाखवून ये दारुकी दुकान चालू रखनी है, तो तुझे डेली दारु का बंफर नही दिया तो सबको मार डालूंगा, तुम्हारी दुकान चलने नही दूंगा. असे म्हणत त्याने जबरदस्तीने दारुचा एक बंफर आणि दोन कॉटर घेवून गेला.

लिकर शॉपीवरील मॅनेजर राजेश कार्डा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ कालिया रा. तांबापुर याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular