
हातगाव – रावसाहेब निकाळजे
विधानसभेत दोन पंचवार्षिक काळात आमदार म्हणून काम करत असताना शेवगाव व पाथर्डी या दोन्ही ही तालुक्यात समान निधी देऊन मतदार संघाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला असून केलेल्या या विकास कामामुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याने पुन्हा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये विकास कामे करणाऱ्यांनाच साथ द्या. असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.शेवगाव तालुक्यातील अंतरवली बु.येथे अंतरवली बु.ते उगले वस्ती व प्रभुवाडगाव येथे प्रभुवाडगाव ते नागरे वस्ती या दोन कामाचे मिळून सुमारे १ कोटी ४० लाख रुपये किमतीच्या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ झालेनंतर आयोजित कार्यक्रमात आ.राजळे बोलत होत्या. केंद्र व राज्य शासनाने राज्यातील गोरगरीब व तळागाळातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या योजना केल्या असून त्या योजना प्रत्येका पर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन योजनेचा लाभ जास्तीत – जास्त लाभार्थ्यांना कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून आमदारकीच्या दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने विकास कामे करताना जवळपास ३ वर्ष निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही उपलब्ध न झाल्याने विकास कामे करताना अनंत अडचणी येत होत्या मात्र आता २ वर्षाच्या काळात आपले सरकार स्थापन झालेपासून मतदार संघातील विकास करण्यासाठी भरघोष निधी उपलब्ध होत असल्याने व मंजूर कामाची वर्क ऑर्डर झाल्या शिवाय मी कधीच भूमिपूजन करत नाही असे सांगून थोड्याच दिवसात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विकास कामे करणाऱ्यांना साथ द्या असेही आ.राजळे यांनी म्हटले आहे.अंतरवली बुद्रुक येथे शहादेव खेडकर, जिवन कसाळ, दिगंबर कणसे, किरण चव्हाण, लहू वडते, जालिंदर कापसे, भारत कापसे, अशोक बानाईत, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब ढाकणे, राजेंद्र पोपळघट, गोरख दराडे, ब्रम्हदेव आठरे, अमोल, अशोक खडे, प्रकाश खाडे, विशाल चव्हाण, ताराबाई पालवे, नानासाहेब गायकवाड, संदीप पठाडे, प्रदीप कापसे, कडूबाई पठाडे यांचेसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक ह.भ.प.सीताराम महाराज उगले यांनी केले असून आभार ग्रामसेवक द्वारकानाथ आंधळे यांनी मानले आहेत.तर प्रभुवाडगाव येथील कार्यक्रमात सरपंच ज्ञानेश्वर घोडेराव, संजय खेडकर, बापुसाहेब पाटेकर, अर्जुन खेडकर, जालिंदर बटूळे, देविदास बटूळे, रवि कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून या वेळी सुरेश नेमाने, केदारेश्वर कारखान्याचे संचालक अशोक तानवडे, कुद्दूस पठाण, केशव आंधळे, शिवाजी समिंदर, भगवान तेलोरे, संदीप पातकळ, सोमनाथ मडके, नारायण मडके, सुनिल वडघणे, राम पाथरकर, अनिल परदेशी, नारायण पाखरे, बाळासाहेब तेलोरे, सुधाकर मडके, दिलीप विखे यांचेसह सा.बा. विभागाचे राठोड, घुले, साबळे, ठेकेदार भगत, मुरदारे, खुरमुरे यांचेसह रंगनाथ बटूळे, राजेंद्र बटूळे, भक्तराज बटूळे, अजिनाथ केदार, अंकुश बटूळे, रामकिसन जायभाय, बाबासाहेब बटूळे, वसुदेव बटूळे, शेषराव बटूळे, अशोक ढाकणे, अजिनाथ जायभाय, काकासाहेब बटूळे, महादेव बटूळे, अशोक दराडे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन शरद चाबुकस्वावर यांनी केले असून आभार संतोष ढाकणे यांनी मानले आहेत.