
हातगाव – रावसाहेब निकाळजे
राज्य शासनाच्या विनोबा ॲप मध्ये पोस्ट ऑफ द मंथ हा तालुकास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवाली बुद्रुक येथील उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री पुनम राऊत वाघमारे यांचा शेवगावच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या हस्ते यांना प्रमाणपत्र व शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या उपक्रमांतर्गत हसनापूर येथील शाळेतील विनायक सुरसे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे.तर शारदा काकडे (अंतरवाली खुर्द) तसेच बबीता बबीता पालक (गायकवाड जळगाव) यांना ही केंद्रस्तरीय पोस्ट ऑफ द मंथ केंद्रस्तरीय पुरस्कार मिळाला.या सर्वांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्याची वाटप गट शिक्षणाधिकारी कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विषय तज्ञ नितीन मिसाळ, केंद्रप्रमुख बबन ढाकणे आदी उपस्थित होते.कोलते म्हणाल्या, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांनी राबवलेले उल्लेखनीय उपक्रम, अध्यापनासाठी वापरलेले शैक्षणिक साहित्य, शिक्षकाची यशस्वी स्टोरी यांची एकमेकांना देवाणघेवाण करावी.यासाठी विनोबा अँप वापर होत आहे.अहमदनगर आकाशवाणीने पुनम राऊत यांची मुलाखत घेऊन विनोबा अँप याविषयी व शाळेच्या उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली.त्यांची आकाशवाणी वरील मुलाखतही सोशल मीडियात शिक्षकांमध्ये चांगलीच व्हायरल झाली होती.ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, बोधेगाव बीटचे विस्तार अधिकारी डॉ.शंकर गाडेकर यांचेसह पंचक्रोशीतून यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.