Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याकार चोरी करणारा संशयित MIDC पोलिसांच्या जाळ्यात, ५ दिवस पोलीस कोठडी

कार चोरी करणारा संशयित MIDC पोलिसांच्या जाळ्यात, ५ दिवस पोलीस कोठडी

लोकशक्ती न्यूज| नितीन ठाकूर

जळगाव :-एमआयडीसी परिसरातील कार चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास करून एका चोराला अटक केली आहे. कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील सद्गुरु नगर जुना वसाहत, एमआयडीसी जळगाव येथुन घरासमोर पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिपक जगदीश खडके यांची क्र. एमएच ०२ सीडब्लु ०९०६ ही कार घराचे समोर असताना चोरी झाली होती. (केसीएन) पोका राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे, यांनी तांत्रीक पद्धतीने तपास करुन सदर कार ही संभाजीनगरच्या दिशेने गेल्याचे दिसुन आल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन वेगवेगळ्या टिम तयार करुन संभाजीनगरच्या दिशेने तपास करण्यासाठी रवाना केले.तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार जो फक्त चारचाकि स्वीफ्ट गाडयाच चोरी करतो असा शेख दाऊद शेख मंजुर (रा. सुंदरवाडी, संभाजीनगर) याचे नाव समोर आले. सदर आरोपींवर संपुर्ण राज्यासह भारतभर चारचाकि चोरीचे गुन्हे दाखल आहे. गोपनीय बातमीच्या आधारावर शेख दाऊद शेख मंजुर रा. सुंदरवाडी संभाजीनगर यास त्याचे राहते घरुन टिमने शिताफिने ताब्यात घेतले.

त्याचेकडे एक स्वीफ्ट डीझायर कार क्र. एमएच १५ जी ए ४८८७ ही सुध्दा मिळुन आल्याने सदर कारबाबत त्यास विचारपुस करता त्याने सदर कार ही परभणी येथुन चोरी केल्याची कबुली दिली.परभणी येथे संपर्क करून सदर कार बाबत नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली आहे. (केसीएन) संशयित आरोपी हा फिर्यादी दिपक जगदीश खडके यांच्या मालकीची चोरीस गेलेल्या कारबाबत काहीएक माहीती देत नसल्याने त्यास त्याचेजवळ मिळुन आलेल्या कारसह ताब्यात घेवुन दि. ११ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता ०५ दिवस पोलीस कस्टडी रीमांड दिली आहे.

सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका दत्तात्रय बडगुजर, पोना किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पौका. राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा तपास पोहेका दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular