लोकशक्ती | नितीन ठाकूर
जळगाव : प्रतापनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अतिक्रमित बांधकाम हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आदेशानुसार ते अतिक्रमण हटवले जात असून मात्र मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रात्री आमच्या घरी चुकीच्या माहितीवरून दगडफेक केली. मोकळ्या जागेवर आम्ही रहिवाशांनी बांधलेले मूळ हनुमान मंदिर पुन्हा त्याठिकाणी स्थापीत करावे, अशी आमची मागणी होती, न्यायालयाने तेच मांडले आहे. मात्र वस्तुस्थिती न समजून घेता दगडफेक करण्यात आली, असे अँड. सुशील अत्रे यांनी शनिवारी दि. १९ रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अतिक्रमित बांधकाम हटविण्यावरून शुक्रवार दि. १८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मनसेच्या काही लोकांनी अँड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली होती. घडलेल्या प्रकारानंतर अँड. पंकज अत्रे यांनी जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. (केसीएन) त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. समाजमाध्यमात काही चुकीचे संदेश अँड. सुशील अत्रे यांच्याबाबत प्रसारित झाले, त्याबाबत अँड. सुशील अत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली.प्रताप नगरातील हि ओपन स्पेस जागा होती. तेथे २२ वर्षांपूर्वी चौथऱ्यावर हनुमानाची मूर्ती ठेऊन मंदिर तयार केले होते. मात्र स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) यांनी तेथे येऊन अतिक्रमण सुरु केले. सुरुवातीला १० टक्के अतिक्रमण आता पूर्ण करून टाकले. यात हनुमानाची मूर्ती कोठेतरी गायब झाली. यामुळे परिसरातील नागरिकांच्या सहीने २००२ मध्ये खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली होती. (केसीएन) २०१५ मध्ये त्यावर उच्च न्यायालयाने आदेश देत स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) यांना ३ महिन्यात अतिक्रमण हटवण्याचे आदेश केले. त्यावर स्वामी समर्थ संस्था सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. याबाबत २२ वर्ष खटला न्यायालयात चालला. स्वामी समर्थ केंद्राने अतिक्रमण हटवून पूर्वीचे हनुमान मंदिर त्याठिकाणी असू द्यावे. नियमानुसार ओपन स्पेसमध्ये १० टक्केपेक्षा अधिक बांधकाम असू नये, असे अँड. सुशील अत्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (केसीएन) स्वामी समर्थ केंद्राच्या जागेवर पूर्वीचे मूळ हनुमान मंदिर हटवण्यात आले. परिसरातील नागरिकांना पूजा करण्यास अडचण होत असल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. मंदिरासाठी जागा १९८३ मध्ये मनपाने दिली अशी बाजू केंद्रातर्फे मांडण्यात आली, मात्र मनपाने जागा दिल्याचा कोणताही ठराव नाही.तसेच सेवा केंद्राची नोंदणी देखील १९८८ मध्ये झालेली आहे. त्यामुळे हे सर्व अतिक्रमण असल्याचे न्यायालयाने म्हटले होते, असे अँड. सुशील अत्रे यांनी सांगितले. हि सर्व वस्तुस्थिती असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमच्या घरावर अश्लील करून दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवालही अँड. सुशील अत्रे यांनी विचारला. यावेळी अँड. सुशील अत्रे यांच्या घराच्या अंगणात फेकलेल्या दगडांमुळे व खिडकीच्या फुटलेल्या काचांमुळे रात्रीच्या घटनेची दाहकता स्पष्टपणे दिसून येत होती.