Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज : भाजपची पहिली यादी जाहीर ; जळगावात आ.भोळे ; जिल्ह्यात...

ब्रेकिंग न्यूज : भाजपची पहिली यादी जाहीर ; जळगावात आ.भोळे ; जिल्ह्यात यांची लागली वर्णी !

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे तर दुसरीकडे नुकतीच महायुतीतील भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांना पुन्हा संधी भाजपने दिली तर भुसावळ मतदार संघासाठी संजय वामन सावकारे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. तर चाळीसगाव मतदारसंघात मंगेश चव्हाण, जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी गिरीश महाजन यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले आहे.

शिरपूरमधून काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणाघाट, तर डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular