Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्यादोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन

दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन

जळगाव : नितीन ठाकूर

ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि. १९ व २० ऑक्टोबर असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडेमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF अॅडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी अशोक जैन म्हणाले की, अशा प्रकारच्या सेमीनारचे बुद्धिबळाच्या विकासासाठी, सक्षम व कुशल आरबीटर व कोचेस साठीचे महत्त्व विषद केले. चेस इन स्कूलचे महत्त्व विषद करून आरबीटर व कोचे यांनी सेमीनारचा फायदा घ्यावा व या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे अपडेट करावे असा मोलाचा सल्ला दिला.

चिफ फॅकल्टी इंटरनॅशनल आरबीटर वसंत बी. एच. व आय.ए. नितीन शेणवी, पुणे यांचे स्वागत आय.ए. प्रवीण ठाकरे व आकाश धनगर यांनी केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल इ. विविध राज्यांमधून एकुण ८० चेस आरबीटर व कोचेस यात सहभागी झालेले आहेत. जळगावमधून नथू सोमवंशी, भरत आमले व आकाश धनगर यांनी सहभाग नोंदवला. या सेमीनारसाठी जैन इरिगेशन प्रायोजकत्व लाभले.सचीव नंदलाल गादिया यांनी सूत्रसंचलन केले व सर्वांचे आभार मानले. भारतात तरुण व उद्योन्मुख खेळाडूंच्या आशादायी कामगोरी मुळे होणाऱ्या बुद्धीबळ या खेळाचा झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अशा प्रकारच्या सेमीनारचा आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular