Sunday, April 6, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्यारेकॉर्ड ब्रेक गर्दी सुमारे २५ हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव...

रेकॉर्ड ब्रेक गर्दी सुमारे २५ हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल, महायुतीचे दिग्गज एकत्र

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

धरणगाव / जळगाव दि. २४ महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सुमारे २५ हजाराच्यावर कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेनेची मुलुख मैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन ना. पाटील यांची भव्य रॅली सुरू झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीत गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले.येत्या २० तारखेला श्री क्षेत्र पद्मालय येथे प्रचार नारळ फोडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज दाखल करून आल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, गुलाबभाऊ हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असून देखील पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अर्ज भरताना दिसून आल्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही.
यानंतर ते पुढे म्हणाले, गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एवढा जनसागर अर्ज दाखल करण्यासाठी येणे हा एक रेकॉर्ड ब्रेक आहे.

गावांमधून हजारोंच्या संख्येने समर्थकांनी वाजत-गाजत नाचत धरणगाव गाठले. अनेक गावामधील हजारो तरुणानी घोषणांनी जोरदार जयघोष करत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून धरणगाव गाठून रॅली व सभेला हजेरी लावली. सर्वात पहिल्यादा ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगावचे दैवत मानल्या जाणाऱ्या श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या विजयासाठी साकडे घातले. यानंतर एका उघड्या जीपवरून पालकमंत्र्यांची भव्य रॅली काढण्यात आली. बालाजी मंदिरापासून धरणी, धरणी बाजार, कौट बाजार, पी. आर. हायस्कूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही रॅली आली. संपूर्ण धरणगाव शहर है भगवामय झाले होते. उघड्या जीपवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चंदु अण्णा सोनवणे, खा. स्मिताताई बाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रॉ. कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी विराजमान होते. यात सहभागी झालेल्या तरूणाईच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेसाठी दिनांक २४ रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सुमारे २५ हजार जनसागराच्या साक्षीने आपला अर्ज दाखल केला.

गावातून हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यकर्ते, या रॅलीत महिलांची उपस्थिती देखील लक्षनिय होती. रॅलीत उपस्थित नागरिकांसाठी ठिक ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular