Sunday, April 6, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याहुश्श…! काय करायचं या सोन्याचं,दिवाळी तोंडावर सोने-चांदी भावात पुन्हा वाढ; खरेदीपूर्वी वाचा...

हुश्श…! काय करायचं या सोन्याचं,दिवाळी तोंडावर सोने-चांदी भावात पुन्हा वाढ; खरेदीपूर्वी वाचा जळगावातील आजचे भाव?

लोकशक्ती न्यूज । नितीन ठाकूर

जळगाव : आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना दोन्ही मौल्यवान धातू त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. यामुळे ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागतेय. दरम्यान जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

दोन दिवसापूर्वी ६०० रुपयाची घसरण झालेल्या सोने दरात शनिवारी ७०० रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. यामळे आज रविवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,९७० रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर जीएसटीसह सोने ८१,९८८ या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

दुसरीकडे शनिवारी चांदी दरात १ हजार रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा एक किलोचा भाव ९९,००० रुपयावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील बँकांनी व्याजदर घटवले व युद्धजन्य परिस्थितीत वाढ झाल्याने चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन प्रथमच १ लाख रुपये किलोवर (विना जीएसटी) गेले होते. मात्र दोन दिवसापूर्वी घसरण झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular