Sunday, April 6, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याजळगाव चोट्यांच थैमान, पोलिसांनी पकडले रंगेहाथ

जळगाव चोट्यांच थैमान, पोलिसांनी पकडले रंगेहाथ

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर


मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात करीत असल्याची कुणकुण घरातील सदस्यांना लागली. त्यांनी आरडाओरड करताच शहाकुब शेख ताजोद्दीन (वय २२, रा. कासमवाडी) या चोरट्याने पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन तो पळून जावू लागला. परंतु त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील गणेश वाडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश वाडी परिसरात चेतन अशोक डहाके हे राहत असून त्यांचे वेल्डींगचे वर्कशॉप आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ते घरात झोपलेले असतांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना घरात कोणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पहिल्या मजल्यावर चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याला घरातील लोक जागी झाल्याचे कळताच त्याने थेट पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्यानंतर चोरटा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पळून जाता आले नाही, यावेळी त्याच्यासोबत असलेला साथीदार मात्र तेथून पळून गेला.

पहाटेच्या सुमारास डहाके यांच्या घरातून आरडाओरड करण्याचा आवाज ऐकूण त्यांच्या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी डहाके यांच्या घराशेजारी असलेला घराच्या कंपाऊंटमध्ये संशयित चोरटा शहाकुब शेख ताजोद्दीन हा लपून बसलेला होता. यावेळी नागरिकांनी त्या चोरट्याला चांगलाच पब्लिक मार दिला. परिसरात आरडाओरड सुरु असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, गुन्हे शोध पथकातील रतन गिते, नाना तायडे, महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रविवारी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular