Tuesday, April 8, 2025
spot_img
37.9 C
Delhi
Tuesday, April 8, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याआरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू , प्रचार थांबवला.. सच्चा कार्यकर्ता हरपला...

आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू , प्रचार थांबवला.. सच्चा कार्यकर्ता हरपला -प्रतापराव पाटील

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

पाळधी येथील अतिशय शांत व संयमी असलेले तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे संपूर्ण काम पाहणारे तसेच जीपीएस मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा अनिल आत्माराम महाजन यांची जीवनातून अचानक निवृत्ती झाल्याने संपूर्ण पाळधी परिसरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने शोकाकुलांची उपस्थिती होती.

अतिशय सर्वसाधारण परिस्थिती असलेले अनिल महाजन हे प्रतापराव पाटील यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते. मंत्री गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना शारीरिक त्रास जानवू लागला त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी त्यांना तत्काळ जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मुंबई येथे रवाना होण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार त्यांना मुंबई येथे नेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यांचा रक्तात ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला व अनिल महाजन यांनी धास्ती घेतली होतातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला जीपीएस मित्र परिवाराचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांचा परिवारासह मित्रपरिवार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular