Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्यानिवडणुकीच्या प्रशिक्षणात गोंधळ : दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

निवडणुकीच्या प्रशिक्षणात गोंधळ : दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ प्रथम प्रशिक्षण वर्ग हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने सदर प्रशिक्षण वर्गास मतदान प्रक्रिये विषय सखोल मार्गदर्शन व मतदान यंत्र हाताळणी तसेच सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर ठिकाणी प्रशिक्षण सुरू असतांना कळमसरा जि. प. शाळेचे उपशिक्षक किशोर पाटील व नगरदेवळा ता. पाचोरा येथील के. एस. पवार हायस्कूलचे उपशिक्षक इकबाल अ. मजीद शेख यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (खत कारखाना) गिरड रोड, पाचोरा येथे प्रशिक्षण वर्गात न बसता बाहेर उभे होते. त्यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना प्रशिक्षण वर्गात बसुन घेणे बाबत सांगीतले.मात्र दोन्ही शिक्षक प्रशिक्षण वर्गात न बसता त्यांनी निवडणुकीवर कार्यरत अधिकारी /कर्मचारी यांचेशी हुज्जत घातली व मला प्रशिक्षणास बसायचे नाही व मला प्रशिक्षण घ्यायचे नाही, असे प्रशिक्षण मी यापुर्वीच भरपुर वेळा घेतलेले आहे, असे सांगुन गोंधळ घातला व कामकाजामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. हे निवडणूक निर्णय अधिकारी भुषण अहिरे यांच्या निदर्शनास आले. शिक्षक किशोर पाटील व इकबाल अ. मजीद शेख यांचे विरूध्द शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे का पाठविण्यात येवू नये ? तसेच आपणाविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील तरतुदी नुसार कारवाई का करण्यात येवू नये ?याबाबतचा लेखी खुलासा २४ तासाच्या आत सादर करावा. तसेच आपला खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास, आपले काहीही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरण्यात येईल. अशी नोटीस उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुषण अहिरे यांनी संबंधित कर्मचारी यांना दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular