
लोकशक्ती न्यूज, l नितीन ठाकूर
अहमदाबाद येथून जळगावला पहिल्यांदाच येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा संदेश विमान कंपनीला मिळाला. एअरपोर्ट अॅथोरिटीसह पोलीस प्रशासनाची एकच धावपळ सुरु झाली. यावेळी ते विमान मंगळवारी रात्रीच्या सुमारास जळगावात आल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. मात्र यामध्ये काहीही आढळून न आल्यामुळे प्रवाशांसह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने विमान कंपनी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. जळगावहून मुंबई, पुणे, गोवा व हैदराबाद येथे नियमित सेवा सुरु झाल्यानंतर आता अलाइंस एअरची अहमदाबाद जळगाव सेवा मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर पासून सुरु झाली आहे. मंगळवारी या सेवेचा पहिलाच दिवस होता. अहमदाबाद येथून जळगावला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा संदेश एअरपोर्ट अॅथोरिटीला प्राप्त झाला. धमकीचा संदेश मिळताच त्यांनी याबाबतची माहिती जळगाव पोलिसांना दिली.