Sunday, April 6, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याजळगाव मुक्कामी बस कोरोना काळापासून बंद केल्यामुळे गैरसोय..

जळगाव मुक्कामी बस कोरोना काळापासून बंद केल्यामुळे गैरसोय..

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

निंभोरा, ता. रावेर. रावेर तालुक्यातील निंभोरा बु: येथे मुक्कामी असलेली सकाळी पाच वाजेला जळगावला जाणारी बस कोरोना काळापासून बंद केल्याने निंभोरा येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. पंचक्रोशीतील तालुक्यातील मोठे गाव असून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.

एसटी बस आगाराने व रेल्वे प्रशासनाने दादर अमृतसर एक्सप्रेस बंद केल्याने दुहेरी गैरसोयीच्या कोंडीत अडकवले आहे कोरोनाकाळा पूर्वी सकाळी ७:०० ला असलेली पॅसेंजर गाडी रात्री २:३० वाजता झाल्याने ती देखील मोठी गैरसोय झाली आहे. आरोग्यविषयक अडचणी, तसेच शाळकरी मुले, चाकरमान्यांची जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे तरी रावेर आगाराने या संदर्भात सकाळी ५:०० ला मुक्कामी बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता ही बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी होत आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular