Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्यागवळी समाजा तर्फे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सगर उत्सव साजरा !

गवळी समाजा तर्फे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सगर उत्सव साजरा !

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

संगणक आणी इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजात दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा (रेडा, म्हशी पूजन) सगर पूजनाची परंपरा कायम सुरू आहे.महाभारत काळात भगवान श्री कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते.तेव्हा पासुन सगर पूजनाची(रेडा, म्हशी पूजन)सुरवात झाली आहे असे जुने जाणकार सांगतात.पारंपरिक दुग्ध व्यवसाय निमित्त गवळी समाज बांधव दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा निमित्त सगर उत्सव साजरा करतात.

आगामी काळात व येणाऱ्या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणूनगाई-म्हशी लक्ष्मी चे स्वरूप आणी यम राजाचे वाहन रेडा असून दिवाळी पाडव्या निमित्त सगर पूजन केले जाते.वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठीही परंपरा आजही जोपासत आहे.दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात.या उत्सवाचे महत्त्व म्हणजे सगर अर्थात रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते.

जळगांव शहरात मोहाडी रोड परिसर तसेच शिरसोली गवळी वाडा परिसरात वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे, युवा प्रदेश अध्यक्ष कृष्णा गठरी,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, सचिव नारायणराव बारसे, सहसचिव अशोक जोमीवाळे, शंकर काटकर,विशाल बारसे, साहेबराव बारसे आदी समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular