Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याधक्कादायक ! जळगावात मेडीसीन साहित्याने भरलेला ट्रक पेटविण्याची प्रयत्न

धक्कादायक ! जळगावात मेडीसीन साहित्याने भरलेला ट्रक पेटविण्याची प्रयत्न

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये मेडीसीन साहित्य भरलेला ट्रक पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून वाहनातील सामान आगीत जळाले आहे. ही घटना आज शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास समोर घडली असून याप्रकरणी एकाला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
जळगाव शहरातील जयदीप मेडिसिन ट्रान्सपोर्टचे मालक सलीम बशीर खान (रा. शिवाजीनगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवारी सात नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी आयशर मिनिट ट्रक क्रमांक (एमएच ०३ ईजी ३०९९) मध्ये चाळीसगाव, भडगाव तालुक्यात मेडिसिन डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काही मुद्देमाल मेडिसिनचे पार्सल आर.आर.विद्यालय येथून भरून तो ट्रक सलीम बशीर खान यांच्या घरासमोर शिवाजी नगरात पार्किंगला लावलेला होता. दरम्यान शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलीम बशीर खान हे ट्रक घेवून निघाले असता शहरातील शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावरून जात असतांना एका ट्रकमधून धुर निघत आल्याचे सांगितले
.

त्यावेळी सलीम बशीर खान यांनी ट्रक थांबवून मागचा दरवाजा उघडला असता त्यात आग लागल्याचे दिसून आले. यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेवून ही आग विझविण्यास मदत केली. यावेळी ट्रकमध्ये दोन बॉक्समध्ये कापूस फटाके सुतळी बॉम्ब आणि पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवून त्याला एग्नेटर जोडून ठेवल्याचे आढळून आले. जेणेकरून रिमोटचे बटन दाबताच ट्रकने पेट घेवून खान यांना ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात नुकसान व्हावा असे उद्देश होता. परंतू हा प्रकार उघडकीला आल्यानंतर सलीम बशीर खान यांनी तातडीने जळगाव शहर पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर दोन्ही बॉक्स पोलीसांनी खाली केले.

दरम्यान सलीम बशीर खान हे १२ वर्षापुर्वी शहरातील राणे ट्रान्सपोर्ट येथे नोकरीला होता. त्यानंतर सलीम खान यांनी राणे येथील काम सोडून आपला स्वत:चा जयदीप मेडीसीन ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे राणे मेडीसीन ट्रान्सपोर्टचे संचालक धिरज जितेंद्र राणे याला व्यवसायात तोटा होत होता. त्यामुळे त्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीसांनी संशयित म्हणून धिरज राणे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular