Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याएकनाथराव ढाकणे यांची कॅम्ब्रीज विद्यापीठाच्या मानद पीएचडीसाठी निवड

एकनाथराव ढाकणे यांची कॅम्ब्रीज विद्यापीठाच्या मानद पीएचडीसाठी निवड

लोकशक्ती न्यूज l प्रा. विजय लेंडाळ

मौजे राक्षी ता. शेवगाव येथील ढाकणे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे यांना लंडन येथील केंब्रीज डिजीटल विद्यापीठामार्फत ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिले जाणान्या मानद पीएचडीसाठी निवड करण्यात आली आहे. दि.२३/११/२०२४ रोजी त्यांना हा सन्मान गोवा येथील विद्यापीठाच्या पदवीप्रदान दिक्षांत सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

सन २०१० साली मौजे राक्षी ता. शेवगाव याठिकाणी आपल्या केदारेश्वर ग्रामिण विकास प्रतिष्ठाण, संगमनेर या सेवाभावी संस्थेअंतर्गत के. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या नावाने डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी शैक्षणिक संस्थेचे रोपटे लावले. आज या रोपट्याचे रूपांतर सदाहरित वटवृक्षात झाले आहे. दुर्लक्षित ठरलेल्या या भागात उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून या भागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मा. एकनाथराव ढाकणे यांनी कंबर कसली, प्रतिभावंत गरीब होतकरू व कष्टकरी समाजातील मुले तांत्रिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना विविध सोयी-सवलती देण्यात येत आहे. ढाकणे साहेबांनी आपल्या मातीशी इमान राखून येथील बेरोजगारी, गरीबी निर्मूलनासाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येथून तंत्रशिक्षण घेऊन आपले भविष्य घडवताना दिसत आहे. आपले बरेचसे विद्यार्थी शासकीय / निमशासकीय स्वायत्त संस्था खाजगी आस्थापनांमध्ये सेवारत आहे. अगदी दिल्लीच्या मेट्रोकामातही ढाकणे साहेबांचे विद्यार्थी सेवा देताना दिसतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुले १५-२० लाखांचे पॅकेज घेत आहेत. आज शेवगाव-पाथर्डी-नेवासा- गेवराई-पैठण याभागांतील नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायतीतून अनेक विद्यार्थी शासकीय कामे करीत आहेत. परिसरात अनेक नवीन उद्योग उदयास येत आहे. हे सर्व घडले ढाकणे साहेबांच्या दूरदर्शीपणामुळे. आज हा अवलिया उजाड माळरानावरील ध्येयवेडा व्यक्तीमत्व, शेवगाव तालुक्याचे भूमीपुत्र आणि ग्रामसेवकांचे दिपस्तंभ, ग्रामविकासाचा वारकरी, आधारवड ठरला आहे.

ढाकणे पॉलिटेक्निक आणि समर्थ आयटीआयच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना माफक दरात व्यावसायिक शिक्षण उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून संस्थेकडे सातत्याने पदवी अभ्यासक्रम सुरू करणेसाठी मागणी होत होती. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे यांनी याबाबीचा सर्वकष विचार करून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मौजे राक्षी ता. शेवगाव येथे समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच सुनिताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मैनेजमेंट (एमबीए कॉलेज) सुरू करण्यात आले आहे. शेवगाव परिसरात पदची / पदविका अभियांत्रिकी / एमबीए महाविद्यालय सुरू होत असल्याने याचा फायदा शेवगाव, पाथर्डी, नेवासा, पैठण, गेवराई, शिरूर (कासार) या भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

अतिशय अल्पावधीत पॉलिटेक्नीक कॉलेजने ग्रामीण भागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, ढाकणे पॉलिटेक्नीक कॉलेज, शेवगाव या संस्थेस एशियन टूडे रिसर्च अॅण्ड मेडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत ‘नेशन प्राईड अवार्ड २०२०’ अंतर्गत ‘बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही संस्थेस नवी दिल्ली येथील ऑल इंडिया विझनेस अॅण्ड कम्युनिटी फाउंडेशन या संस्थेमार्फत ‘शिक्षा भारती अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने हॉलंडचे उच्चायुक्त डॉ.डी. के बनी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे. सन २०१५ मध्ये अलमा युके येथे नॅशनल एक्सलेन्स आणि राष्ट्रीय विभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. दि.२३ मे, २०१२ रोजी नवी दिल्ली येथील गुलमोहर हॉल, इंडियन हवीयत सेंटर, लोधी रोड येथे राष्ट्रीय संमेलनात माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. बुटासिंगजी, रमांडा पा अफ्रिकन देशाचे हाय कमिशनर डॉ. विल्यम, सी.बी. आयचे संचालक मा. जोगिंदर सिंगजी, कझाकिस्तानचे देशदूत डॉ. उल्मो नुली आणि इंडियन अचिव्हर्स फोरमचे डॉ. हरिश चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे यांनी पुरस्काराचा स्विकार केला.

सामाजिक उपक्रमाबाबत सांगायचे ठरल्यास विशेष उल्लेख करावेसे वाटते ते, मेरी माटी मेरा देश, वृक्षदिंडी, वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलन, एड्स दिन, हे कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देण्यासाठी महाविद्यालयात कवड्डी, खो-खो या खेळांच्या विभागीय पातळीवरील स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. तसेच क्रीकेट, फुटबॉल, कॉली बॉल यांसारखे मैदानी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन यांसारख्या खेळांद्वारे विद्यार्थीना बौद्धिक चालना देणाऱ्या खेळांचे बाळकडू पाजण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत प्रजासत्ताक दिन, स्वातंत्रदिन, महाराष्ट्र दिन, गणेश उत्सव, दिपोत्सव, विविध राजकीय नेत्यांच्या जयंती-पुण्यस्थिती, रविंद्रनाथ टागोरे साहित्य महोत्सव इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, बाद विवाद स्पर्धा, कल्चरल डे, टिचर्स डे, इंजिनिअर्स डे, स्त्री जन्माचे स्वागत, घेतली जात आहेत. विद्यार्थ्यांनीच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात ‘स्पार्क-२०२३’ हा सांस्कृतिक महोत्सव, ‘गॅलक्सी-२०२३ आर्ट गॅलरी, ‘समर्थ २०२३’ हे कॉलेज मॅगेझीन इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.

यापूर्वीही एकनाथराव ढाकणे यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेच्या माध्यमातून ज्याज्या ठिकाणी नियुक्ती झाली त्याठिकाणी त्यांनी नंदनवन फुलवले. गणोरे ग्रामपंचायत, चंदनापुरी ग्रामपंचायत याठिकाणी त्यांच्या अथक प्रयत्नांतून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला करून दिला. जागतिक आरोग्य समितीच्या प्रामविकास आणि हगणदारीमुक्ती योजनेबाबत बांग्लादेश आणि पश्चिम बंगाल येथील अभ्यासगटात ढाकणे साहेबांचा समावेश होता, त्यात त्यांनी भरीव योगदान दिले, ढाकणे साहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना थेट कैब्रीज डिजीटल विद्यापीठामार्फत मानद पीएचडी साठी नामांकन मिळाले आहे, ही बाब निश्चितच नगरजिल्ह्यासाठी भूषावह आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक, पालक, लोकप्रतिनिधी, ढाकणे शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांतजी ढाकणे, समन्वयक ऋषिकेश ढाकणे, संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य डॉ. आर.एच अत्तार, डॉ.ए.डी.डोंगरे, सचिव सौ. जया राहाणे मॅडम, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ढाकणे साहेबांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular