Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्यापशु गणना करताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करा, यांनी दिल्या सूचना

पशु गणना करताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करा, यांनी दिल्या सूचना

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

ळगाव : पाच वर्षातून एकदा होणारी पशु गणना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. या पशु गणनेच्या माध्यमातून विविध भागात असलेले पशुधन त्यांची परिस्थिती करावयाच्या उपायोजना या सर्व बाबींचे आकलन होत असल्याने पशु गणना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पशु गणना प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर नरवाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप झोळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मास्टर ट्रेनर डॉ. अमित कुमार दुबे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पशु गणनेच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती मिळते. पशु प्राणी यांची काळजी कशी घ्यावी याची देखील माहिती या निमित्ताने पुढे येते. पशुगणना हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने पशु गणना ही सूक्ष्म नियोजन पद्धतीने करावी. पशु गणना करताना गाव खेड्यावरील एकही पशु सुटणार नाही याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. गाव खेड्यावरील प्रत्येक गोठ्यापर्यंत जाऊन पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशु गणना करणे आवश्यक असल्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की, 25 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या पशु गणनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील पशुंविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. पशुगणनेच्या माध्यमातून विविध जाती प्रजातींच्या पशूंची गणना होणार असून त्यानिमित्ताने जिल्ह्यात असलेल्या पशुधनाची आकडेवारी पुढे येणार आहे. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा दुग्ध व्यवसाय तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने देखील पशुधनांना अत्यंत महत्त्वाची आहे. 21 वी पशुगणना ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असल्यामुळे गणना करताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात बुलढाणा येथून खास उपस्थित असलेले मास्टर ट्रेनर डॉ. अमितकुमार दुबे यांनी पशु गणना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular