Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याजळगावात १८ लाखांची घरफोडी चोरटा धुळ्यातून ताब्यात, तीन दिवसाची पोलीस कोठडी

जळगावात १८ लाखांची घरफोडी चोरटा धुळ्यातून ताब्यात, तीन दिवसाची पोलीस कोठडी

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकुर

जळगांव:-शहरातील रामानंद नगर परिसरात १८ लाखाची घरफोडी करणाऱ्या साहिल प्रवीण झाल्टे उर्फ साहिल शेख (रा. पवन नगर, धुळे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन मुक्काम ठोकून धुळ्यातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यास शुक्रवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.रामानंद नगरात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता वनिता जगन्नाथ चौधरी या प्रवचनाला गेल्या असता चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून १८ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घरफोडी दिवसा झाल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची कुंडली काढण्याचे आदेश दिले. ही घरफोडी धुळे येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार रवी नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील, हरीलाल पाटील, राजेश मेढे, प्रदिप चवरे, अक्रम शेख, ईश्वर पाटील अशांचे पथक रवाना केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular