Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याभुसावळच्या २ तरुणांचा पुणे येथे पवना धरणात बुडून मृत्यू!

भुसावळच्या २ तरुणांचा पुणे येथे पवना धरणात बुडून मृत्यू!

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

भुसावळ : शहरातील मूळरहिवासी व हल्ली पुणे येथील बालेवाडीतील खाजगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्चशिक्षीत तरुणांचा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे भुसावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मयूर रवींद्र भारसके (वय २५) व तुषार रवींद्र अहिरे (वय २६) असे त्यांचे नावे आहेत. दोघेही सध्या पुणे येथे राहत होते. तर भुसावळातील लाल जैन मंदिर पाठिमागे, पद्मावती नगर येथील मूळ रहिवासी आहेत. (केसीएन) सदरची घटना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत सिनियर सेल्स एक्झीकेटीव्ह या पदावर कार्यरत मयूर व तुषार हे दोघे मित्र आपल्या अन्य आठ मित्रांसह पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.

भुसावळातील दोघा मित्रांना दुधीवरे हद्दीतील या पवना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्यानंतर दुपारी ४ वाजता ते पोहण्यासाठी उतरले. पोहताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.(केसीएन) दोघे मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडा-ओरड केली. तसेच स्थानिकांना माहिती दिली होती. शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोघांना २० तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने विना मोबदला थेट खंडाळा (पुणे) येथून भुसावळ येथे मृतदेह पोहच करण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिल्याने दोघा मृत युवकांच्या नातेवाईकांना आधार मिळाला होता.धरणात बुडालेल्या तुषार (सोनू) अहिरे याचे वडील रवींद्र अहिरे यांचे गेल्या मार्च महिन्यात निधन झाले तर आजोबा प्रकाश देवराम अहिरे यांचे गत नोव्हेंबर महिन्यात १३ रोजी निधन झाले. या दुःखाःतून परिवार सावरत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अहिरे परिवार मूळ खडकदेवळा, ता.पाचोरा येथील रहिवासी असून रेल्वे नोकरीनिमित्त भुसावळात स्थायीक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular