Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याकार झाडाला धडकून भीषण अपघात; रावेरच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

कार झाडाला धडकून भीषण अपघात; रावेरच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

रावेर । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताची मालिका थांबता थांबत नसून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. सावदा-भुसावळ मार्गावरील पिंपरूळ जवळ भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात रावेर शहरातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यु झाला.ही वार्ता रावेर शहरात पसरताच नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

वृत्तानुसार, भुसावळहून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना एमएच २० सीएस ८००२ नंबरची गाडी भरधाव वेगाने झाडाला जोरदार टक्कर दिली. या दुर्घटनेत रावेर शहरातील शुभम सोनार (वय २५), मुकेश रायपूरकर (वय २३) व जयेश भोई या तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर, गणेश भोई (फोटोग्राफर) व एक अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रात्री दोन वाजता पिंपरूळ व सावदा दरम्यान घडल्याचे सूत्रांकडून समजले आहे. दुर्घटना इतकी भीषण होती की गाडीचा चुराडा झाला आहे.रावेर शहरात ही वार्ता पसरताच शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular