
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी : पाळधी येथे पाळधी व धरणगाव येथील पोलिसांनी शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने मंगळवारी रूट मार्च केला. येथे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या जाळपोळीनंतर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा बंदोबस्त अद्यापही कायम ठेवण्यात आला आहे. गावात दोन दिवसांच्या संचारबंदीनंतर आता शांतता प्रस्थापित झाली आहे. याच उद्देशाने पाळधी व धरणगाव येथील पोलीस व दंगा नियंत्रक पथक यांचा मंगळवारी सायंकाळी पाळधी बुद्रूक व पाळधी खुर्द दोन्ही गावात रूट मार्च करण्यात आला. या वेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते.