
अमोल म्हस्के कांबी प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील कांबी आणि परिसरात सर्वाधिक ग्राहक असलेल्या जिओ कंपनीची रेंज गेली चार पाच दिवसापासून विस्कळीत झाली असून त्यामुळे इंटरनेट सेवा तर सोडाच मात्र साधे मोबाइल बोलणे ही बंद पडले आहे.
कांबी परिसरात जिओ चे सर्वाधिक ग्राहक आहेत या कंपनीचे गावात मोठा टावर ही आहे मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून या परिसरातील रेंज पूर्णता गायब झाली आहे दिवसभर मोबाईल लहान मुलांना खेळण्यासारखी वस्तू झाली आहे .त्यामुळे इंटरनेट सेवा तर पूर्णतः विस्कळीत झाली आहेच. मात्र एकमेकाला संपर्कासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे मोबाईल वरून बोलणे ही मुश्किल झाले आहे. सध्या बारावीचा निकाल लागला आहे. मुलांना विविध कामासाठी इंटरनेटचा वापर करावा लागतो .त्याचबरोबर पदवीत्तर मुलांनाही शैक्षणिक माहितीसाठी अनेकदा इंटरनेटची गरज भासत आहे.शेती साठी बियाणे खरेदी करता वेळी आँनलाईन पेमेंट साठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मनःस्ताप सहन करावा लागला मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे इंटरनेट वर चालणारे सर्व व्यवहार ठप्प झाले असून मुलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे अनेकांनी आपले सिम कार्ड बदलण्याचा सपाटा सुरू केला आहे.आजच्या युगात मोबाईल अत्यावश्यक गरज झाली आहे. मोबाईल ला दर महिन्याला रिचार्ज करावा लागत असतानाही जर रेंज मिळत नसेल तर मोबाईलचा काय उपयोग अशी अवस्था झाली आहे यासंदर्भात संबंधित कंपनीने तातडीने लक्ष घालून मोबाइल सेवा तातडीने सुरळीत न केल्यास संबंधित कंपनीचे गावातील मोबाईल टावर ला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितिन राजपुत विविध कार्यक्रारी सेवा सोसायटी चे संचालक कुंडलिक कुऱ्हे महेंशसिंग राजपुत, युवा उद्योजक गणेश चणे, तात्यासाहेब मडके,आदींनी दिला आहे