
शेवगाव प्रतिनिधी
उचल फाउंडेशन येथिल अरुणोदय भवन या सभागृहात इनरव्हील क्लब ऑफ शेवगाव च्या वर्ष २०२४-२५ साठी चा पदग्रहण समारंभ सौ.हर्षदाताई काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी इनरव्हील क्लब च्या कामाचे कौतुक करतानाच उचल फाउंडेशनच्या कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय केवळ लोकसहभागातून भागातून सुरू असलेल्या ऊसतोडणी कामगार मुलांच्या वसतिगृहास व ऊसतोड कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात काकडे परिवार कायमच पाठीशी राहील असे आश्वासन दिले.
इनरव्हील इंटरनॅशनल क्लबचे हे १०१ वे वर्ष असून चालू वर्ष हे शगुन इयर म्हणून संबोधले गेले आहे. त्यामुळे इनरव्हील क्लब ने स्रियांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून यावर्षी काम करायचे उद्दिष्ट ठेवले असले तरी, इनरव्हील क्लब ऑफ शेवगाव हा क्लब उचल फाउंडेशन च्या माध्यमातून ऊस तोडणी कामगार महिलांसाठी पूर्वीपासूनच आरोग्यविषयक व त्यांच्या सामाजिक प्रश्नाविषयी तळमळीने काम करत असल्याचे चार्टर्ड प्रेसिडेंट डॉ. मनीषा लड्डा यांनी सांगितले.
या पदग्रहण समारंभावेळी मावळत्या अध्यक्षा भारतीभाबी बाहेती यांना सर्वानुमते पुन्हा एकदा२०२४-२५ या वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात आले. तर सेक्रेटरीपदी अश्विनी गवळी, व्हा. प्रेसिडेंटपदी वसुधा सावरकर तसेच आयएसओपदी गायत्री बाहेती ट्रेझररपदी ख्याती लाहोटी, एडिटरपदी सीमा बोरुडे यांची नियुक्ती या वेळी करण्यात आली.
डॉ. मनीषा लड्डा यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या क्लबद्वारे गरजू विद्यार्थ्यांना मदत, वंचित महिलांना आत्मनिर्भर बनवन्यासाठी विविध उपक्रम. तसेच उचल फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्थांना वेळोवेळी केलेली मदत, इत्यादी कामे नियमित क्लब करत असून यापुढेही ही कामे आणखी विस्तारित स्वरूपात करण्याचा मानस प्रेसिडेंट सौ. भारतीभाबी बाहेती यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी एक जुलै या डॉक्टर्स डे चे औचित्य साधत उपस्थित डॉ. विजय वराडे, डॉ. नवनाथ घनवट, डॉ. मयूर लांडे, डॉ. सुयोग बाहेती,डॉ. जयप्रकाश बाहेती, डॉ. सुभाष बाहेती, डॉ. संजय लड्डा, आदी. डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. तसेच चार्टर्ड अकाउंटंट सिद्धार्थ बलदवा यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
त्याचप्रमाणे प्रकट कृषीदिनाचे औचित्य साधत प्रगतशील महिला शेतकरी सौ. सुनिता बडदे, श्रीमती. वसुधा सावरकर, व सौ. मंगल काकडे यांनाही कृषी कन्या म्हणून गौरविण्यात आले.
तसेच गुरुपौर्णिमा निमित्ताने उपस्थित गुरुजनांपैकी सौ. राजश्री रसाळ, सौ. अलोलीक लांडे, सौ. पुष्पलता गरुड, सौ. रूपा मुधोलकर, सौ. सुरेखा काटेकर, आणि सौ. वनिता डाके यांनाही गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित इनरव्हील क्लबच्या सदस्य सौ. अलोलिका लांडे यांनी उचल फाउंडेशन साठी दोन हजार रुपये तर डॉ. विजय वराडे यांनी अकराशे रुपये चा आर्थिक सहयोग दिला. तसेच आशाभाबी धूत यांनीही अन्नदान निधी म्हणून पाच हजार रुपये आर्थिक सहयोग दिला. आणि यापुढे कायम अन्नदान निधी म्हणून मासिक ६०००/- रुपये देण्याचे आश्वासनही अशाभाबी धूत यांनी दिले.
यावेळी उपस्थित सौ. मीनाक्षी शिंदे यांनी उचल फाउंडेशनच्या वतीने स्नेहादान या संकल्पनेची माहिती देत उपस्थित मान्यवरांनी या योजनेत मासिक १००/- ₹ सहयोग देऊन उचल फाउंडेशनचे आजीव सभासद व्हावे असे आवाहन केले.
या पदग्रहण समारंभास क्लबच्या सदस्या सौ. प्रिया धूत, सौ. स्वाती गुजर, सौ. ज्योती भडाईत, सौ. सुनिता गवळी, सौ. शितल गडदे, सौ. प्राची सावरकर,सौ. योगिनी पाटील, सौ. भाविका आर्य, सौ. रूपाली तळवळकर सौ. सीमा बोरुडे, आदी सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुजा लड्डा व सौ. राजश्री रसाळ यांनी केले तर आभार सौ. वसुधा सावरकर यांनी व्यक्त केले.