
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
एरंडोल येथील पांडवनगरी बहुउद्देशीय संस्था आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पाडव्यानिमित्त पांडववाड्यासमोर असलेल्या पटांगणावर ५१०० दिवे लाऊन आयोध्या येथील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती.यावेळी मारुती मंदिरात सामुहिक आरती करण्यात आली. शहरात दिवाळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पांडवनगरी बहुउद्देशीय संस्था,विविध हिंदू संघटना व सकल हिंदू समाजाच्यावतीने पांडववाड्यासमोर पाडव्यानिमित्त पाडवा दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेकडो महिला व युवकांनी पटांगणावर सुमारे ५१०० दिवे लावून आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार केली. यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करून श्रीराम, बजरंगबली यांच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.तसेच श्रीरामाचे लावण्यात आलेले भव्य फोटो भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी हनुमान मंदिरात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील,हिमालय पेट्रोल पंपाचे संचालक भगवान महाजन डॉ.राखी काबरा,क्षमा साळी,आरती ठाकूर,रवींद्र पाटील, ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी, आर.डी. पाटील,सुनील चौधरी,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,परेश बिर्ला,आरती ठाकूर,अर्चना तिवारी यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली.