
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगांव:- पाळधी जवळील झूरखेडा येथे दिव्य व अलौकिक श्रीहनुमंतकथा व दिव्य दरबार प. पू. पंडित श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज बागेश्वर धाम यांच्या श्रीमुखाने दिनांक २६ डिसेंबर ते ३० दुपारी दोन ते पाच वाजे पर्यंत होणार आहे. तसेच श्री१०८कुंडी रूद्रयाग महायज्ञचे आयोजन होत आहे ही कथा जळगांव जवळील पाळधी झूरखेडा येथे होत असुन प.पू.महाराजांचा दरबार लागणार आहे. सदरहू कथे करीता अलोटगर्दी चा महापुर होणार आहे. त्याचा लाभ आपण सर्वांना मिळणार आहे व एक अदभुत भक्तिमय सोहळा होणार आहे.
सदरहू कथेत अन्नदान (भंडारा) चालू राहणार आहे यासाठी मार्केट यार्ड व औद्योगिक वसाहतीतील धर्मप्रेमी नागरिक व व्यापारी बंधूना विनंती की त्यांनी या भंडार्या साठी जास्तीत जास्त योगदान करावे. तांदूळ, गहू, दाळी , बेसन, मसाला, तेल, चहा, साखर जे आपणांस शक्य होईल ते जरुर आपण मदत करावी ही नम्र विनंती कथा समीतीने केली आहे. ज्यांना मदत करावयाचे आहे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील
श्री अशोक राठी ९८२३०२९८८८ ,
श्री शशी बियाणी ९८२३०२७४१५ श्री संजय शहा ८२०८२६६५११
यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.
