
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी:- पाळधी येथील साईबाबा मंदिरावर येथे आज २४ रोजी सायकाळी ६ वाजता सगीतमय सुदरकाडने ब्रम्होत्सवाला सुरुवात होणार आहे. जगप्रसिद्ध सुदरकाडकार पी. पी. सुश्री अलका श्रीजी हे संगीतमय सुंदरकांड सादर करणार आहेत. बुधवार, २५ रोजी साय. ६ वाजता भजन सध्याचे आयोजन करण्यात आले असून इंडियन आयडॉल फेम नितीन कुमार याच्याकडून भजन गायन केले जाणार आहे.
पाळधी येथे सालाबाद प्रमाणे आयोजित ‘ब्रह्मोत्सव’ यावर्षी २४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत असून या. तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे यंदा २२ वे वर्ष असून या धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या सख्येने सहभागी होणार आहेत. पाळधी येथे प्राचीन सच्चिदानद सदुरु साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयभू गायल माताजी मंदिर असून स्थापना समारोह साजरा करण्यात येत आहे. समारोह निमित्त यंदा देखील तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात तीन दिवस नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी हे मदिरात मत्रोच्चारात महाआरती व पूजाअर्चा करणार आहेत.
आज सध्याकाळी ६ वाजता प्रयाग पी. पी. सुश्री अलका श्रीजी याच्या सुदरकाडने सपूर्ण परिसर भक्तिमय होणार असून हनुमानाची भगवान श्रीरामाप्रति असलेल्या आस्थेचे वर्णन त्यातून सादर होईल. श्रीसाईबाबा, परमभक्त हनुमान, गायल माताजी याचा सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार आहे. उपस्थिती आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, मधुकर झवर, रामचन्द्र झवर, किरण झंवर, प्रवीण झवर, सुरज झवर, चद्रकात इदाणी, राजेंद्र इदाणी, शरदचंद्र कासट, नितीन लढा, अशोक कासट, राकेश पाटील व समस्त मंदिर समिती, सेवेकरी यांनी केले आहे

