लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव टाइम्स| प्रतिनिधी | १२ जानेवारी रोजी, सुरत वरून जळगाव मार्गे उत्तरेत जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवर जळगाव येथे दगडफेक होण्याची निंदनीय घटना घडली. या आक्रमणात गाडीच्या बी ६ वातानुकूलित डब्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. महाकुंभच्या प्रथम स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दगडफेक करणे अत्यंत गंभीर आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीने जळगावचे पोलीस उपअधीक्षक गावित यांना निवेदन देऊन, या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात समितीने म्हटले आहे की, “धार्मिक यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या हिंदूंवर हल्ले करणे आपल्या देशात अनेक वर्षांपासून चालू आहे. आपल्या जिल्ह्यात श्रीराम नवमी, गणेश विसर्जन यांसारख्या सणांच्या वेळीही आम्ही हे प्रकार पाहिले आहेत. गेल्या वर्षी अयोध्याच्या धार्मिक यात्रेसाठी जाणाऱ्या रेल्वेसाठी किती मोठा बंदोबस्त आवश्यक होता हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे, कुंभ मेलाच्या मार्गावर असे हल्ले होणे अत्यंत चुकीचे आहे.”
समितीने याबद्दल मागील वर्षी जुलै २०२४ मध्ये भुसावळ – सुरत पॅसेंजर ट्रेनवर अमळनेर येथे काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीचा दाखला दिला. त्या वेळी दोन दिवसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु त्या प्रकरणात पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे, असे समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सदस्य प्रशांत जुवेकर, देवेंद्र भावसार, राजेश नाईक, उमेश सोनावणे, ॲड. निरंजन चौधरी, ॲड. केदार भुसारी, ॲड. ललित महाजन, ॲड. विजय चौधरी, ॲड. संतोष उदासी, ॲड. गजानन तांबट आणि इतर अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
समितीने पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की, या प्रकारात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी