
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
शेवगाव तालुक्यातील कांबी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . जयंती निमित्त प्रथम अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये सकाळी मान्यावरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले या वेळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर उद्योजक माऊली चांडे रासपचे बाजीराव लेंडाळ, राजेंद्र लेंडाळ, सतिश काळे, दत्ता डुकरे,मोहन होळकर, शिवाजी होटकर, अमोल नन्नावरे, संदिप काळे, राहुल गावडे,मोनु होळकर,सकल धनगर बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. व समाजातील सर्व उपस्थितांनी कांबी गावातून भव्यदिव्य अशी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा गाडीत सजवून मिरवणूक काढण्यात आली. पूर्ण कांबी गावात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.मिरवणुकित लहान मोठ्या सर्व वयातील समाज बांधवांनी सहभाग नोंदविला .