
बोधेगाव प्रतिनिधी निलेश ढाकणे
दिनांक १३/०७/२४ ते दिनांक २२/०७/२४ या कालावधीत होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त रा.प.शेवगाव आगारामार्फत शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांची मागणी आल्यास थेट गावातून पंढरपूर यात्रेसाठी बस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.त्यासाठी आगारामार्फत ग्रामपंचायत कार्यालया सोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन शेवगाव आगारामार्फत करण्यात आले आहे.
सदर मोहीमेअंतर्गत प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील भाविकांना पूर्ण मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्ष पर्यंत च्या भाविकांना ५०% सवलतीत प्रवास, महिला भाविकांना ५०% सवलतीत प्रवास योजना लागू राहणार आहे.त्यामुळे थेट गावातून पंढरपूर येथून दर्शन घेवून पुन्हा गावात थेट बससेवा भाविकांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.भाविकांसाठी करण्यात आलेल्या सदर विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन शेवगाव आगाराचे आगार व्यवस्थापक श्री.अमोल कोतकर यांनी केले असून बसेस बुक करण्यासाठी स्थानक प्रमुख श्री.किरण शिंदे यांचा दूरध्वनी क्रमांक 98501 21196 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.