Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeधार्मिकविठ्ठल नामाची शाळा भरली'!

विठ्ठल नामाची शाळा भरली’!

कांबीच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा.

कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के.

वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात कांबी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला.हातत जनजागृती फल झाडे लावा झाडे जगवा, लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा तसेच विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले.
कांबी येथील जिल्हा परिषद शाळेत मध्ये आषाढी एकादशी निमित्त जनजागृती दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी श्री सदगुरू विश्वासनंद महाराज मंदिर तसेच हनुमान मंदिर परिसरात पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्ये अवतरले. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.यावे शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव डेंगळे, बाबासाहेब लहासे,सुहास वाळके, एस.के.पवार,रवि गरुड, सारिका दौंड,वंदना नरवडे,अदि शिक्षक रुंद सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular