
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के.
शेवगाव तालुक्यातील कांबी येथील श्री सदगुरू विश्वासनंद महाराज मठाच्या विश्वासगिर शंकरानंद गिर मठ संस्थान च्या विश्वस्तपदी श्री सुरेशचंद्र विश्वासराव होळकर यांची श्रीम.यु.एस.पाटील.(धर्मदाय उप आयुक्त) अहमदनगर यांनी नियुक्ती केली.
विश्वास नंद महाराज यांच्या वर नितांत श्रध्दा असणारे व गेल्या तीस वर्षांपासून महाराजांची भक्ती आणि सेवा करणारे कांबी येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा कांबी गावचे माजी सरपंच सुरेशचंद्र विश्वासराव होळकर यांची विश्वासगिर संस्थान च्या विश्वस्तपदी निवड झाली. त्या निमित्ताने श्री सदगुरू विश्वासगिर संस्थान कांबी च्या वतीने संस्थान चे मठाधिपती महंत प्रल्हादनंद गिरी महाराज यांनी सुरेशचंद्र होळकर यांचा सन्मान केला.
या वेळी बोलताना नवनियुक्त विश्वस्त सुरेशचंद्र होळकर यांनी सांगितले की, विश्वस्त मंडळ व भक्त परिवाराने दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन संस्थानचे कामकाज करील.
या वेळी संस्थान चे विद्यमान अध्यक्ष श्री ताराचंद अण्णा भिसे,विश्वस्त श्री नारायण मरकड, श्री शंकर अण्णा नरके, माजी सरपंच अशोक नाना म्हस्के,डॉ सतिश मनचुके,डॉ अरुण भिसे,ह. भ.प.किशोर महाराज भिसे, श्री दत्तात्रय गाडे, श्री इसाक भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राजपुत, जर्नाधन मनचुके ,गणेश म्हस्के, आनंद आढाव, भाऊसाहेब बर्डे,काकासाहेब गाडे, बाबुराव मडके, भगवान गाडे.आदी ग्रामस्थ व भक्त मंडळी उपस्थित होते.