Saturday, April 5, 2025
spot_img
27.2 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeमहाराष्ट्रअवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी सरपंचांची बैठक

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी सरपंचांची बैठक

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव : – जिल्ह्यातील चांदसर या ठिकाणी तलाठी यांना मारहाण झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. वर्ष संपायला एक दिवस बाकी असताना जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा वाळू असलेल्या भागातील सरपंचाची बैठक लावली. या बैठकीत कोणताही ठोस असा निर्णय झाला नाही. मात्र तुमचे गाव तुम्हीच राखा असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सोमवार दि. ३० रोजी जिल्हा नियोजनसमितीमध्ये धरणगाव, अमळनेर, भडगाव,पाचोरा, जळगाव ग्रामीण व इतर ठिकाणीसरपंच, तलाठी, उपसरपंच, ग्रामपंचायतसदस्य यांना बैठकीस आमंत्रित करण्यातआले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वररेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे वइतर विभागाचे अधिकारी व कर्मचारीउपस्थित होते.

यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने आपापल्या समस्या मांडल्या व वाढीव वाहतूक थांबवण्यासाठी त्यांनी मागणी केली. मात्र यावेळी तुमचे गाव तुम्हीच राखा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कोणतेही संरक्षण देण्यात येईल की नाही, त्यांनी कारवाई करून कोणाला सांगायचे याबद्दल कोणत्या सूचना देखील देण्यात आल्या नाहीत.

आम्ही अवैध वाळू थांबवू मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा पोलीस प्रशिक्षण मिळेल काय याबाबत या बैठकीत सांगण्यात आले नाही. मग अवैध वाळू उपसा वाहतूक कशी थांबवावी असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण अवैध वाळू वाहतूक करणारे आमच्या अंगावर धावून येतात त्यांच्याजवळ शस्त्र असतात. आमच्याकडे कोणते शस्त्र काहीच नसते. मग ही वाळू वाहतूक कशी थांबवावी असा गंभीर सवाल या वेळेला सरपंचांनी जिल्हा प्रशासनाला केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular