
शेवगाव प्रतिनिधी :
दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी शेवगाव तालुक्यातील हजारो दिव्यांग बांधव जाणार असल्याचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण अभंग यांनी सांगितले.
दिव्यांगांना प्रति ६००० हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. भूमीहीन बेघर दिव्यांगाना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी.ग्रामपंचायत, जिल्हा परिषद महानगरपालिका मध्ये दिव्यांगाणा राजकीय आरक्षण द्या,सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालय अडथळा विरहित करा,दिव्यांगाची १० लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढा, दिव्यांगाना सरकारी नोकरी सामावून घ्यावे. दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळावी,दिव्यांगाना लाईट बिल व कर या मध्ये ५०% सुट देण्यात यावी, बाजार समिती सहकार क्षेत्र साखर कारखाने यांच्यावर किमान एक दिव्यांग प्रतिनिधीत्व देण्यात यावे इत्यादी मागण्या मान्य होण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेवगाव तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने या मोर्चा साठी नियोजन सुरू असून गाव गावातील दिव्यांग बांधव यांच्या सोबत संपर्क करुन या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी तसेच प्रवासाची व्यवस्था सुरू आहे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अ.नगर च्या महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, शेवगाव तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण अभंग यांच्या सह प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे प्रमुख पदाधिकारी याकामी नियोजन करत आहेत.