
शेवगाव प्रतिनिधी : दिनांक ०९ जुलै ते २२ जुलै या कालावधीत झालेल्या आषाढी पंढरपूर यात्रे निमित्ताने शेवगाव एसटी आगाराने भाविकांसाठी केलेल्या ३४१७६ किमी प्रवासी वाहतुकीतून आगाराला एकूण २०,३९,३१८/- चे उत्पन्न मिळाले आहे.सदर कालावधीत एकूण ५७ बसेसच्या माध्यमातून एकूण १६,८१३ प्रवासी भाविकांनी पंढरपूर येथे जावून दर्शनाचा लाभ घेतला.यात महिला प्रवासी ४११७,७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ७३०५ इतके होते.यावर्षी चापडगाव,वरूर
या गावांतून थेट पंढरपूर साठी बसेस सवलतीच्या दरात देण्यात आल्या होत्या,अशी माहिती आगार व्यवस्थापक श्री.अमोल कोतकर यांनी दिली.गतवर्षी २००० किमी जास्त चालनात आले असून गतवर्षीपेक्षा उत्पन्न ३ लाख रु.ने वाढले आहे. माहे जुलै महिन्यात अद्याप पर्यंत एकूण २८०० विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास शाळेत वाटप करण्यात आले असून एकूण १५०० विद्यार्थी मासिक पास वाटप करण्यात आलेले आहेत.शालेय विद्यार्थी,धार्मिक स्थळी प्रवास करणारे प्रवासी,नोकरदार प्रवासी या सर्वांसाठी वेळेत, किफायतशीर व सुरक्षित प्रवास शेवगाव आगाराकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिणामी माहे एप्रिल ते जून २४ या पहिल्या त्रैमासिक मध्ये शेवगाव आगार एकूण १३ लाख रु.ने नफ्यात आला आहे. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे,यंत्र अभियंता अविनाश साखरे,सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री.धर्मराज पाटील,पालक अधिकारी श्री.संकेत राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव आगार व्यवस्थापक श्री.अमोल कोतकर,स्थानक प्रमुख श्री.किरण शिंदे,वाहतूक निरीक्षक श्री.ऋषिकेश सोनावणे,श्री. राजेंद्र वडते,सुभाष गवळी व चालक,वाहक, यांत्रिक कर्मचारी यांच्या सहकार्याने शेवगाव आगाराने पहिल्या त्रैमासिक मध्ये १३ लाख रुपये इतका नफा मिळविला आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक श्री.कोतकर यांनी दिली..