Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयशिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा आज पासून पद्मालय येथे प्रचार दौऱ्यास शुभारंभ...

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा आज पासून पद्मालय येथे प्रचार दौऱ्यास शुभारंभ !

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर – जळगाव


शिवसेना , भाजपा अजितदादा गट राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचारचा शुभारंभ आज 27 ऑक्टोबर 2024 सकाळी 7.30 वाजता पवित्र आणि ऐतिहासिक अश्या श्री क्षेत्र पद्मालय येथे होत आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील व पदाधिकारी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडून म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचार करणार आहेत. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ना.गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई गवळी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील यांची देखील उपस्थिती राहणार आहे यावेळी मतदारसंघातील तिन्ही पक्षांचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 7.30 वाजता पद्मालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे , रॉ.कॉ. चे रमेशबापू पाटील व सेनेचे संजय पाटील सर, भाजपाचे सरचिटणीस डी. जी. पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, रवी कापडणे, अनिल भोळे ,भाजप तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ.पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भूषण पाटील, श्याम पाटील, धरणगाव व नशिराबाद शहर प्रमुख विलास महाजन, विकास धनगर तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – रिपाई महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

आजचा प्रचार दौरा : म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गट
श्री क्षेत्र पद्मालय येथे सकाळी 7:30 वा. नारळ वाढविण्याचा शुभारंभ झाल्यानंतर म्हसावद स. 9:00 वा – बोरणार, स .11:00 वा – लमांजन, दुपारी 12:30 व – कुऱ्हाळदे, दुपारी 1:00 वा प्रचार सुरू राहील त्यानंतर वावडदा येथे दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून बिलवाडी येथे दुपारी 3:30 वा, डोमगाव – सायंकाळी 4:30 वा, बिलखेडा- सायंकाळी 5:30 वा. त्यानंतर वावडदा येथे सायंकाळी 6:00 वा. प्रचाराला सुरुवात होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular