
गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने महायुतीचे सरकार येणार, मी ही आमदार होणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळगाव ग्रामीण विधानसभेचे महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय येथे श्री गणपतीचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीचे सरकार येणार आहे, विरोधकांनी आपले शक्ती आणि युक्ती लावावी, पण आमदार तर मी होणार अशी प्रतिक्रीया दिली आहे.