Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeराजकीयमाझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! - गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल...

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! – गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव : दि. 27 – शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.*श्री गणरायाच्या अडीच पीठापैकी एक असलेल्या बाप्पाचे गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेत आरती करून आज प्रचाराचा श्रीगणेशा केला..मंत्री गुलाबराव पाटील हे सहाव्यांदा निवडणूक लढवत असून महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र मध्ये विकासाची गंगा वाहली असून मतदार संघात केलेला विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढत आहोत. महायुतीला राज्यात पावणे दोनशेच्या वर जागा मिळतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी – कोल्हे, अनिल अडकमोल , पवन सोनवणे, महायुतीचे तालुका पदाधिकारी यांच्यासह अनेक जेष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाबराव पाटील यांचे जोरदार स्वागत केले, यावेळी गणपती बाप्पा मोरया, गुलाबराव पाटील आगे बढो, बाळासाहेबांचा विजय असो, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी पद्मालय परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले. *पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मांदियाळी*यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी. एम. पाटील, रवी कापडणे, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , भाजपाचे तालुका अध्यक्ष हर्षल चौधरी, हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद मानकरी, भाजपचे महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, सेनेच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, भारतीताई चौधरी , जळगावचे मा. नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, दिलीप पोकळे, कैलास चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनवणे, राजेंद्र पाटील, हर्षल पाटील, यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular