Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeराजकीयमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्रांचा स्फूर्तीमय प्रचार: युवकांचा उत्साह आणि विकासाची भावनिक...

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्रांचा स्फूर्तीमय प्रचार: युवकांचा उत्साह आणि विकासाची भावनिक साद !

प्रतापराव पाटील व विक्की बाबा यांचा 3 दिवसात 22 गावांत झंझावाती प्रचार

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव दि. 30 – जळगावच्या मातीचा सुगंध अनुभवणारे आणि जनतेच्याहृदयात कोरलेले गुलाबराव पाटील यांच्या प्रचार्थ त्यांचे दोन पुत्र व शेकडो युवकांना सोबत घेवून गावो- गावच्या प्रत्येक गल्लीतून ही दोन भावंडं जनतेच्या मनातल्या आशा-आकांक्षांना चेतवतात. “गुलाबराव पाटील हे केवळ आमचे वडील नाहीत, ते या मतदार संघाचे भूमिपुत्र असून त्यांनी केलेल्या विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ द्यावी अशी भावनिक साद ते घालत आहेत. विकासाच्या ध्येयाशी जोडलेली ही भावनिक साद मतदारांच्या हृदयात नवी उर्जा आणि नवीन अशा निर्माण करत असल्याचे प्रत्येक गावातून जनतेच्या मिळालेल्या दिसून येत आहे.

दोन भावंडांचा तीन दिवसात 22 गावात झंझावाती प्रचार

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व लघुउद्योजक विकी बाबा – पाटील या दोन भावंडांचा तीन दिवसात चांदसर , दोनगाव बु., टहाकळी, आव्हाणी, भोकणी, पथराड बु. पथराड खु., लाडली फुलपाट पाळधी बु. पाळधी खु.,धार, शेरी, कवठळ, दुसखेडा, एकलग्न, पोखरी तांडा, दोनगाव खु. झुरखेडा, निमखेडा, तारखेडा सह इतर 22 गावांमध्ये झंझावाती प्रचार करून मतदाराशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देऊन भक्कम पाठबळ असल्याची ग्वाही दिली. धनुष्यबाण व गुलाबराव पाटील व नेत्यांचे लहान मोठे कट – आउट, भगवे रुमाल, टोप्या व मुखवटे यांचा उपयोग केल्याने प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. प्रचार रॅलीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular