
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
आज दिनांक ३० बुधवार रोजी महायुतीचे, शिवसेना पक्षाचे जळगाव ग्रामीण मधील अधिकृत उमेदवार मा. श्री. गुलाबराव रघुनाथराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कुसुबां रायपूर चंचोली धानवड उमाळे आदी गावांमध्ये प्रचार दौरा आज पार पडला. या दौ-यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मदत करण्यात आलेल्या व्यक्तींना जाऊन आपुलकीने भेटून त्यांना दिवाळीच्या तसेच निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा वैद्यकीय मदत कक्ष टिम ने घरोघरी जाऊन दिल्या आणि मा. श्री. गुलाबरावजी पाटील यांना मोठ्या मताधिकाने विजयी करून पुन्हा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या विकासाला चालना द्या! असे वैद्यकीय मदत कक्ष टिमने नागरिकांना आवाहन केले. प्रचारा दरम्यान शिवसेना उमेदवार मा. गुलाबभाऊं प्रती जळगाव ग्रामीण मधील गावांमध्ये नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघण्यास मिळाले नागिकांनी वैद्यकीय प्रचार टिमचे गावांमध्ये हर्ष उल्हासाने स्वागत केले.
यासमयी प्रचार दौ-यात कुसंबा येथे श्री प्रविण पाटील श्री प्रमोद घुगे चेतन पाटील निर्मल पाटील रायपुर श्री प्रविण परदेशी चंचोली श्री अतुल घुगे विजु लाड गणेश शेळके आदिनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गावांमध्ये वैद्यकीय प्रचार दौ-याचे स्वागत केले.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील प्रचार दौ-यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावेश ढाके, जळगाव ग्रामीण विधानसभा कक्ष प्रमुख विशाल निकम, महानगर चे दिपक पाटील ग्रामीण कक्ष प्रमुख दिपक माळी, तालुका प्रमुख भुषण पाटील, राहुल गवळी आदींसह तेथील स्थानिक शिवसेना, युवासेना, वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी हे दौ-यात सहभागी होते.