Monday, April 7, 2025
spot_img
36.9 C
Delhi
Monday, April 7, 2025
spot_img
Homeराजकीय"धनुष्यबाण केवळ चिन्ह नाही, ते एक जनसेवेचे व लढाईचे प्रतीक" - शिवसेनेचे...

“धनुष्यबाण केवळ चिन्ह नाही, ते एक जनसेवेचे व लढाईचे प्रतीक” – शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील

वसंतवाडी व धरणगावातील कार्यकर्त्यांनी हाती घेतले धनुष्यबाण !

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगांव – शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात धरणगावातील संजय नगर व आई तुळजाभवानी नगर मधील तसेच जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथिल शरद पवार गट रॉ.कॉ. च्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेशाने पक्षाचे बळ वाढले असून “धनुष्यबाण हे फक्त एक चिन्ह नाही, तर एका लढाईचं प्रतीक आहे. धरणगाव व वसंतवाडी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारांसाठी हाती घेतलेलं धनुष्यबाण हे जनसेवेचं प्रतीक बनलं आहे.” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश समारंभावेळी बोलत होते.

शिवसेनेचा धनुष्यबाण यांच्या हाती
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील ग्रा. पं. सदस्य राजू चव्हाण, दशरथ चव्हाण, सरजून चव्हाण, राष्ट्रवादी शाखा प्रमुख प्रकाश चव्हाण, मिथुन चव्हाण, रविंद्र पवार, लक्ष्मण जाधव, भगवान चव्हाण , अर्जुन चव्हाण, रंजीत राठोड़ , भाईदास चव्हाण, सुनील चव्हाण, राजेश चव्हाण, रमेश राठोड़, शालेय समिती अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तर धरणगावच्या संजय नगर येथील दीपक महाजन उर्फ भुरा महाजन, भैय्या महाजन, मच्छिंद्र चौधरी, सागर गायकवाड तसेच आई तुळजाभवानी नगर येथील आदिवासी मित्र मंडळाचे कार्यकर्ते विजय मालचे, सावण अहिरे, शंकर ठाकरे, देवा मोरे, शिवा मोरे, राकेश सोनवणे, गोपाल मालचे, तुषार मालचे, विनोद मालचे, देवराम पवार, शिवा पवार, दीपक मालचे, विक्की अहिरे, मानसिंग (छोटू) अहिरे, किरण सोनवणे, किरण सूर्यवंशी, संतोष शेमले, राहुल शेमले, सुनील शेमले, ओंकार ठाकरे, भटू मालचे, प्रशांत मालचे, अजय ठाकरे, गणेश सोनवणे, मंगला सोनवणे, आनंदा सोनवणे, रमेश बारीला, सुनील बारेला आणि विलास भिल यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेवून उमेदवार गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.

या प्रसंगी धरणगाव तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, नगरपरिषदेचे गटनेते पप्पू भावे, नगरसेवक सुरेश महाजन, शहर प्रमुख विलास महाजन, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, उद्योगपती वाल्मीक पाटील आणि उप तालुका प्रमुख संजय चौधरी ,जळगाव तालुक्यातील तालुका प्रमुख शिवराज पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, उपतालुका प्रमुख जितू पाटील, जिल्हा उपप्रमुख अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल यांची प्रमुख उपस्थित होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular