Monday, April 7, 2025
spot_img
36.9 C
Delhi
Monday, April 7, 2025
spot_img
Homeराजकीयमोठी बातमी : जामनेर मुक्ताईनगर मध्ये सेटलमेंट

मोठी बातमी : जामनेर मुक्ताईनगर मध्ये सेटलमेंट

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जामनेर व मुक्ताईनगर मध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच फटाके फुटले असून तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही अशा सांकेतिक शब्दात सेटलमेंट झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजतेमुक्ताईनगर मतदारसंघात गुजर समाज मोठ्या प्रमाणात आहे याचा फटका मागच्या वेळेस 2019 ला आत्ताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या ताईंना बसला होता. हा पुन्हा धोका होऊ नये म्हणून मुक्ताईनगर व जामनेर मध्ये अंतर्गत हात मिळवणे झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जामनेर तालुक्यात तुतारी चिन्हावर मराठा समाजाच्या शिक्षकाला घोड्यावर बसवले गेले आणि ऐन वेळेस जामनेर मध्ये माझा काही संबंध नाही अशा शब्दात सरांना सुनावले गेले.

एकंदरीत मुक्ताईनगर ची जागा भाऊ तुम्ही घ्या आणि जामनेर ची जागा महाजन भाऊ तुम्ही घ्या अशा शब्दात हा लिखित करारनामा झाला असल्याचे समजते विशेष म्हणजे एका मोठ्या उद्योजकाने ही सेटलमेंट केली असल्याचे सांगण्यात आले.

मुक्ताईनगर मध्ये भैय्या व जामनेर मध्ये सर हे वाऱ्यावर सोडले गेले असल्याचे चित्र आज तरी निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर चे भाऊ व जामनेर चे महाजन भाऊ यांच्यामधील या अंतर्गत सेटलमेंट मुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याची पडसाद मुक्ताईनगर मतदार संघात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच जामनेर मध्ये देखील ही राजकीय घातकी सेटलमेंट अंग देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तूर्तास जामनेर मध्ये मुक्ताईनगर चे भाऊ दिसणार नाही आणि मुक्ताईनगर मध्ये जामनेर चे भाऊ दिसणार नाही प्रचारात किंवा सभांना आले तर मूग गिळून बसतील असे लिखित करा नामा झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular