Monday, April 7, 2025
spot_img
36.9 C
Delhi
Monday, April 7, 2025
spot_img
Homeराजकीयनिवडणुकीतील उमेदवारी बाबत निर्णय घेण्यासाठी उद्या शेवगावात बैठक - युनूस शेख

निवडणुकीतील उमेदवारी बाबत निर्णय घेण्यासाठी उद्या शेवगावात बैठक – युनूस शेख

लोकशक्ती न्यूज l रावसाहेब निकाळजे


शेवगाव : येत्या २० नोव्हेंबर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये २२२शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे मुंगी भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेश सरचिटणीस युनूस चाँद शेख यांनी आपला दाखल केलेला उमेदवारी अर्ज ठेवायचा की काढायचा या बाबत मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ठरवले जाणार असल्याने उद्या रविवार (दि ३)रोजी सकाळी ११ वाजता मिरी (नगर) रोडवरील ममता लॉन्स येथे बैठक बोलावली असल्याची माहिती स्वतः उमेदवार युनूस शेख यांनी आमचे प्रतिनिधिजवळ बोलताना म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडत असून २२२ शेवगाव – पाथर्डी विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या पासून मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा व एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत असून या निवडणुकीमध्ये मला पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना समक्ष भेटून उमेदवारी बाबत मागणी केलेली होती.परंतु पक्षाने उमेदवारी नाकारून विद्यमान आमदारास उमेदवारी दिली असल्याने अगोदरच आमदारावर मतदारसंघात नाराजी असल्याने व पक्षाने माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल न घेतल्याने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

आता या दाखल अर्जावर चर्चा करून तो ठेवायचा की काढायचा या बाबत मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेउनच निर्णय घेण्यात येईल व त्यानुसारच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल असेही शेवटी युनूस शेख यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular